‘न्याय’, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’. ही मूल्ये ‘प्रजासत्ताक भारताची ‘महामूल्ये’ आहेत. ही मूल्ये आपल्या जनमानसात अजून नीट रुजलेली नाहीत, हे आजचे विदारक वास्तव आहे!

ज्या काळात समाजातील विचाराचे केंद्र हे पारलौकिक जीवन बनलेले असते, त्या काळात ईश्वर, यज्ञ, पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष, नरक यासारखे सिद्धान्त निर्माण होत असतात. या सिद्धान्तांचा जनमानसावर खूप मोठा प्रभाव राहत असतो आणि या प्रभावामधूनच ‘भक्ती’सारखे मूल्य उदयाला येत असते. ‘भक्ती’ या शब्दाचा अर्थ स्तुती, अतिशयोक्त गौरव हा असतो. या मूल्यात अपरिहार्यपणे विषमता सामावलेली असते.......